Home राजकीय ‘राहुल गांधींनी माफी मागावी लागेल” ?

‘राहुल गांधींनी माफी मागावी लागेल” ?

197
0

यापूर्वी सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींबाबत अनेक ट्विट केले आहेत.काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं सांगत बाहेरच्या देशांकडं मदत मागतात त्यामुळं आपल्या देशाची बदनामी होते, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांची प्रतिक्रिया समोर आलीये. पित्रोदा म्हणाले, ‘राहुल गांधींनी माफी मागावी लागेल असं काहीही बोललं नाही. भारतासारख्या लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे.’

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा म्हणाले, ‘भाजप आता राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. राहुल गांधींनी असं काहीही बोललं नाही की ज्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे माफी मागावी लागेल. लोकशाहीत जर एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल तीव्रतेनं वाटत असेल तर त्याला तसं बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. राहुल गांधींनी जे बोललं ते खरं आहे.’

यापूर्वी सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींबाबत अनेक ट्विट केले आहेत. राहुल गांधी लंडनमध्ये जे बोलले त्याबद्दलचा खोटेपणाचा प्रचार आणि प्रसार करणं थांबवा. तुम्ही तिथं होता का? तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे का? राहुल गांधी काय म्हणाले तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल त्यांनी केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here