Home क्रीडा जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत साक्षी,लवलिना उपांत्यपूर्व फेरीत

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत साक्षी,लवलिना उपांत्यपूर्व फेरीत

230
0

आशियाई ब्राँझपदक विजेती साक्षी चौधरी व टोकियो ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती लवलिना बोगहिन या भारताच्या दोन महिला खेळाडूंनी जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आप आपल्या गटात प्रतिस्पर्थ्यांना जोरदार ठोसे मारत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताच्या प्रीती हिचे आव्हान मात्र सोमवारीच संपुष्टात आले.
२३ वर्षीय साक्षी हिने ५२ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या झाझीरा उरकबायेवा हिच्यावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. हरयानाच्या साक्षीसमोर कझाकस्तानच्या खेळाडूचा निभाव लागला नाही. साक्षीने आक्रमक खेळ करीत या लढतीत सहज विजय मिळवला हे विशेष. लवलिना हिने मेक्सिकोच्या वेनिसा ओटींझ हिला ५-० असे नमवले. लवलिना हिने ७५ किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी खेळाडूला अगदी सहज हरवले.लवलिना व वेनिसा यांच्यामधील लढत एकतर्फी झाली. साक्षी व लवलिना यांनी अंतिम आठमध्ये प्रवेश केला. मात्र प्रीती हिला थायलंडच्या जितपोंग जुतामस हिच्याकडून ४-३ असे पराभूत व्हावे लागले. प्रीती हिने ५४ किलो वजनी गटात कडवी झुंज दिली. पण तिला विजय मिळवता आला नाही. रिव्यूनंतर या लढतीचा निकाल लावण्यात आला. सहा खेळाडू आज लढणार भारताच्या सहा महिला खेळाडूंच्या लढती उद्या होणार आहेत.नीतू ४८ किलो वजनी गटात, तर मनीषा ५७ किलो वजनी गटात लढेल. शशी चोप्रा ६३ किलो वजनी गटात सर्वस्व पणाला लावेल. निखत झरीन ५२ किलो वजनी गटात आणि जास्मिन लॅम्बोरिया ६० किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्याना टक्कर देईल. मंजू बाम्बोरिया ६६ किलो वजनी गटात सहभागी होईल. भारतीय खेळाडूंच्या सहाही लढती उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती असणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here