Home मुंबई सदानंद कदम ईडीच्या ताब्यात,साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात,साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई

321
0


मुंबई:रामदास कदम यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे समजते. दापोली येथील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे कळते. त्यामुळे परबांच्या अडचणी वाढल्यात.मनी लॉड्रिंग आणि दापोली येथील कथित साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी यापूर्वीच ईडीने छापेमारी केली होती. त्यांच्याविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली होती.रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे पथक मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून, अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांना अटक केल्याचे म्हटले आहे.साई रिसॉर्ट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोलीचे आमदार संजय कदम यांनीही रामदास कदम यांच्यावर आरोप केले होते. कदम म्हणाले होते की, साई रिसॉर्ट हे अनिल परबांचे नाही. तर ते रामदास कदम यांचा भाऊ सदानंद कदम यांचे आहे. रामदास कदम हे काय आहेत, हे जनतेला माहित आहे. जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार असा टोलाही हाणला होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here