Home jobs BSF मध्ये तब्बल १२८४ रिक्त पदांसाठी भरती

BSF मध्ये तब्बल १२८४ रिक्त पदांसाठी भरती

408
0

तुम्ही देखील सरकारी नोकरीसाठी संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कॉन्स्टेबलच्या तब्बल १२८४ रिक्त पदांसाठी सीमा सुरक्षा दल (BSF) ने पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.याबद्दल अधिक माहिती BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर देण्यात आली आहे. हे लक्षात ठेवा उमेदवार या पदासाठी ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात.

रिक्त पदे

इच्छुक उमेदवारांनी २७ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. या भरती मोहिमेद्वारे, १२८४ रिक्त जागा भरल्या जातील, त्यापैकी १२०० जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि ६४ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. श्रेणीनिहाय रिक्त पदांचे तपशील अधिकृत अधिसूचनेत दिलेले आहेत.

अर्जासाठी पात्रता

कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. यासोबतच पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेमी आणि महिला उमेदवारांची उंची 155 सेमी असावी. इतर सर्व विहित पात्रता आणि इतर माहिती अधिसूचनेत दिली आहे.

अर्ज करण्याची शुल्क

अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 100 रुपये आहे तर आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी ते विनामूल्य आहे. अर्जाच्या वेळी ४७. २० रुपये प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here