Home इतर ‘पहिलाच’ दिवस ठरला ‘शेवटचा’…!

‘पहिलाच’ दिवस ठरला ‘शेवटचा’…!

43
0

मराठवाडा साथी न्यूज

वसई : जेव्हा सर्व जगात वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यात येत होता. त्याच दिवशी वसईतील एका १८ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला.
भरधाव वेगात येणाऱ्या एका दुचाकी चालकाने रस्ता क्रॉस करणाऱ्या तरुणीला जोरदार धडक दिली.सकाळी १० वाजेच्या सुमारास वसईच्या रेंज नाक्याजवळ, रस्ता क्रॉस करत असताना हा अपघात झाला.या भीषण अपघातामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अल्फिया सय्यद असे मृत तरुणीचे नाव असून ती बारावीचे शिक्षण करून घराच्या मदतीसाठी नौकरी करायची.

दरम्यान, तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.मोटार सायकल तसेच आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.मृत मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटने संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here