Home मनोरंजन राणी मुखर्जी आता मर्दानी 3 या चित्रपटाच्या तयारीला

राणी मुखर्जी आता मर्दानी 3 या चित्रपटाच्या तयारीला

421
0

मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी जोरदार चर्चा होत आहे. पण मात्र या आनंदात रमण्यापेक्षा राणी मखर्जी पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे. राणी मुखर्जी आता मर्दानी 3 या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी करत आहे.

म्हणजेच आता गुन्हेगारांना घाम फोडायला शिवानी रॉय लवकरच पुन्हा एकदा पोलीस दलात दाखल होत आहे. ‘मर्दानी’ च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वेला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने मुखर्जी खूश आहेत. आशिमा छिब्बर दिग्दर्शित जो सागरिका चक्रवर्ती हिने तिच्या दोन मुलांच्या ताब्यासाठी नॉर्वेजियन अधिकार्‍यांविरुद्ध केलेल्या प्रदीर्घ संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळाला. एका मुलाखीदरम्यान राणी म्हणाली जर स्क्रिप्ट रोमांचक नसेल, तर चित्रपट बनवण्यात काही अर्थ नाही,” 2014 मध्ये मर्दानी समोर आला होता. त्याच्या जबरदस्त यशानंतर 2019 मध्ये दिग्दर्शक गोपी पुथरान यांनी त्याचा सिक्वेल तयार केला”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here