Home छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे आंदोलन;छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज ‘शहर बंदची हाक

महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे आंदोलन;छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज ‘शहर बंदची हाक

225
0

छत्रपती संभाजीनगर:औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले आहे. यावरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाला काही जणांनी विरोध केला असून त्या विरोधात गेली 7 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर आज शहर बंदची हाक महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे देण्यात आली आहे.छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात शहरात वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा भाग काल औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने गुरुवारी शहरात कँडल मार्च काढण्यात आला होता.तर आज महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुपारी लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.इम्तियाज जलील म्हणाले की, माझे नाव तुम्ही शहराला देऊन मला मोठे करा असे संभाजी महाराजांनी सांगितले होते का? ते महापुरूष आहेत यात काहीही दुमत नाही. त्यांचा आदर करण्यात कोणताही वाद नाही, पण त्याबाबत सुरू असणाऱ्या राजकारणाविषयी आक्षेप आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here