Home छत्रपती संभाजी नगर अवकाळीच्या नुकसानीचे‎ पंचनामे करून भरपाई द्या;माजी खासदार खैरे

अवकाळीच्या नुकसानीचे‎ पंचनामे करून भरपाई द्या;माजी खासदार खैरे

204
0

छत्रपती संभाजीनगर‎:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड,‎ वैजापूर, गंगापूर तालुक्यात मागील‎ आठवड्यात अवकाळी वादळी वारे,‎ पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले‎ आहे. यामध्ये मका, गहू, कापूस, हरभरा,‎ ऊस, भाजीपाला, डाळिंब, मोसंबी या पिकांचे‎ मोठे नुकसान झाले आहे. पाळीव जनावरेही‎ दगावली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड‎ अडचणीत आलेला आहे. विनाविलंब पंचनामे‎ करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी,‎ अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे माजी‎ खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकारी‎ अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.‎ खैरे यांनी दोन दिवस जिल्ह्यातील‎ अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची‎ पाहणी केली. या वेळी जिल्हाप्रमुख किशनचंद‎ तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले,‎ उपजिल्हाप्रमुख संजय पाटील यांच्यासह‎ पदाधिकारी उपस्थित होते. खैरे म्हणाले की,‎ नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करून‎ शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे‎ आहे. नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना‎ प्रोत्साहनपर २५,००० प्रतिहेक्टरी अनुदान‎ वितरित करण्यात यावे. सर्व पात्र शेतकऱ्यांना‎ प्रधानमंत्री सन्मान निधी देण्यात यावा. यासाठी‎ सर्कलनिहाय मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी‎ अधिकारी यांना मेळावे घेण्याचे आदेश द्यावेत.‎ पीक विम्याचे पैसे तसेच जी पाळीव जनावरे‎ मृत्युमुखी पडली, त्यांचेही अनुदान देण्यात‎ यावे असे ते म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here