Home मुंबई २०२४ लोकसभा : मोदी x पवार

२०२४ लोकसभा : मोदी x पवार

594
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव येत आहे. ज्या पद्धतीने पवार शेतकरी आंदोलनाच्या संदर्भाने आक्रमक झाले, त्यांनी ज्या पद्धतीने देशातील विरोधी पक्षांची मोट बांधली, त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात UPA चे अध्यक्षपद शरद पवारांकडे येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. सोनिया गांधी या सक्रिय राजकारणातून निवृत्ती होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर देशभर ही चर्चा जोरात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीचे राजकारण

राजकारणात जे-जे अशक्य मानले जाते, ते-ते सगळे ज्येष्ठे नेते शरद पवार शक्य करून दाखवितात. हे अनेकदा देशातील आणि राज्यातील जनतेने पाहीले आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंशी मैत्री असो की प्रमोद महाजनांशी सलगी असो. त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही. कारण राजकारणातील विरोध हा त्यांनी कधीच वैयक्तीक संबंधात आणला नाही आणि आणणारही नाही, अशी त्यांची ठाम भुमिका आहे. म्हणूनच त्यांनी बहूमत असतांनाही महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडीची मोट बांधली. फक्त मोट बांधून थांबलेच नाहीत, तर विधान परिषदेत निर्विवाद यशही मिळवून दाखविले. तेवढा विश्वास त्यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

तीन पक्षांची आघाडी झाली घट्ट

काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन पवारांनी जी महाविकास आघाडी राज्यात निर्माण केली आहे. त्याची दखल देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी घेतली. त्यांचा फार्म्युला वापरून बिहारमध्ये नितीशकुमारांनी सत्ता स्थापन करावी, असा सल्लाही पवारांनी दिला होता. केंद्रातील राजकारणात पवारांचे महत्व अधोरेखीत केलेले आहे. त्यात त्यांनी हे महाराष्ट्रात अस्तित्वात आणलेले नवीन राजकीय समीकरणही चर्चेचा विषय ठरला आहे.

काँग्रेस आणि UPA चे अध्यक्षपदाची चर्चा

काँग्रेस आणि UPAचे नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावे यावर गेल्या अनेक दिवसांमध्ये धुसफूस सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ती जबाबदारी स्वीकारू शकतात. बिहारच्या निवडणुका आणि त्यानंतर हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर UPAच्या अध्यक्षपदी पुन्हा कोण ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सोनियांची रिटायरमेंट

सोनिया गांधी रिटायरमेंट घेतल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे नाव पुढे केले होते. मात्र UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला आहे. खासदार राहुल गांधी यांना नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाला. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांना पंतप्रधापदाचे उमेदवार व्हावे यासाठी काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी गळ घातल्याची देखील चर्चा आहे.

पंतप्रधानपदाचेही पवारच उमेदवार?

आगामी लोकसभा निवडणुकीला आणखी 4 वर्ष अवकाश आहे. आत्तापासून काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा UPA कडून केला होता. मात्र त्या निवडणुकीत काँग्रेसचा धोबीपछाड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत माघार घेतली. त्यानंतर पुन्हा सगळी सूत्र सोनिया गांधींच्या हाती गेली. मधल्या काळात यावरून अनेक वाद आणि गटबाजी देखील झाली पण UPA अध्यक्षपदाची जबाबदारी येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याबाबत सर्वाचे एकमत आहे का? हेही महत्वाचे आहे.

अजात शत्रु पवार

पवारांनी आत्तापर्यंत जे बेरजेचे राजकारण केले. त्यामुळे त्यांचे संबंध देशातील सगळ्या राजकीय पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याचा फायदा त्यांना अनेकदा झालेला आपण पाहीला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे राजकारण यशस्वी करून दाखविले आहे. त्याच पद्धतीने त्यांनी देशातही सगळ्या विरोधी पक्षांची महाविकास आघाडी करावी, अशी आपेक्षा दिल्लीतील सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची आपेक्षा आहे. काँग्रेसी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल असोत की पी. चिदंबरम शशी थरूर या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत गांधी घरणे आणि राहूल गांधी यांच्यावर जे आरोप केले होते. तेही याच खेळीचा एक भाग असल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here