Home औरंगाबाद जे करतो ते रोखठोकपणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जे करतो ते रोखठोकपणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

978
0

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात विकास कामांचे उदघाटन केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काम करतो ते रोखठोक करतो. कोरोनाचे संकट आले नसते ते निवडणुका मार्च-एप्रिलमध्येच झाल्या असत्या. यापूर्वी कामे केली म्हणूनच लोकांचे शिवसेनेवर प्रेम आहे. निवडणुका काय आम्ही कधीही जिंकतोच, पदवीधरपण जिंकलीच की असा ठाकरे शैलीतील टोला विरोधकांना लगावला. या शहरावर शिवसेनाप्रमुखांचे विशेष प्रेम होते. तेवढेच प्रेम येथील नागरिकांनीही आमच्यावर केले आहे. आजवर भरभरून दिले. त्यामुळे शहरवासीयांच्या ऋणात राहून मला या सर्वांचे भवितव्य प्रकाशमय करायचे आहे. तरुणांना रोजगरासह शहराचा विकास करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणात दिले.

शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद शहरासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या १६८० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळा गरवारे स्टेडियम येथे संपन्न झाला. ययासोबतच मिटमिटा येथे शंभर एकर जागेवर विकसित होणाऱ्या सफारी पार्कचे आणि सिडकोत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यान व स्मारकाच्या कामाचा शुभारंभ देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, सतीश चव्हाण, अतुल सावे, उदयसिंग राजपूत, रमेश बोरणारे, विनोद घोसाळकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय आदींची मंचावर उपस्थिती होती.

आणि…मुख्यमंत्र्यांनी खुर्ची बदलली

गरवारे स्टेडियमवर भूमिपूजन सोहळ्यासाठी भव्य मंडप व मंच उभारण्यात आला होता. मंचावर प्रमुख अतिथींसाठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी विशेष सिंहासन सारखी खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र, मंचावर येताच मुख्यमंत्र्यांनी खुर्ची पाहून ती बदलण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे शेवटी घाईघाईत अन्य पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीपैकी एक त्यांच्यासाठी ठेवण्यात आली. यामुळे मुख्यमंत्री असलो तरी साधेपणा आजही जपतो असा संदेश या कृतीतून त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here