Home अमेरिका अमेरिकेत भारतीय वंशाचे पहिले जज ; अरुण सुब्रमण्यम

अमेरिकेत भारतीय वंशाचे पहिले जज ; अरुण सुब्रमण्यम

267
0

मुंबई : भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांच्या CEO पदी भारतीय वंशाच्या दिग्गजांची निवड झाली असून, आता पुन्हा एकदा भारतीयांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे. भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम यांची दक्षिण आशियाचे पहिले जज म्हणून निवड झाली आहे. याशिवाय ते न्यूयॉर्क जिल्ह्याचे जज म्हणून पदाभार स्वीकारणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय जाहीर केला. अरुण सुब्रमण्यम हे न्यूयॉर्क इथल्या दक्षिण जिल्ह्यातील न्यायालयाची सेवा करणारे पहिले दक्षिण आशियाई जज असणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

न्यूयॉर्क जिल्हा कोर्टामध्ये अरुण सुब्रमण्यम यांच्या व्यतिरिक्त इतर नावांची देखील शिफारस करण्यात आली होती. मंगळवारी हा प्रस्ताव सिनेटमध्ये पाठवण्यात आला होता त्यामधून जो बायडन यांनी अरुण सुब्रमण्यम यांची निवड केली .

सुब्रमण्यम सध्या न्यूयॉर्कमधील लॉ फर्म सुसमन गॉडफ्रे एलएलपीमध्ये भागीदार आहेत.२००७ पासून ते येथे काम करत आहेत. त्यांनी २००६ ते २००७ या कालावधीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रूथ बेड जिन्सबर्गसाठी लिपिक म्हणून काम केले.

यापूर्वी त्यांनी २००५ ते २००६ या काळात न्यूयॉर्कच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात न्यायमूर्ती जेरार्ड ई लिंचसाठी काम केले. २००४ ते २००५ पर्यंत ते अपील कोर्टाचे न्यायाधीश डेनिस जेकब्स यांचे लॉ लिपिक होते.

सुब्रमण्यम यांनी २००४ मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून जेडी पदवी प्राप्त केली आणि २००१ मध्ये वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमधून बीए केले. यापूर्वी नॅशनल एशियन पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशनने सुब्रमण्यम उमेदवारी दिल्याबद्दल सुब्रमण्यम यांचे अभिनंदन केले होते. असोसिएशनचे कार्यवाहक अध्यक्ष अब क्रूझ म्हणाले की सुब्रमण्यम एक अनुभवी वकील आहेत, त्यांच्याकडे निःस्वार्थ सेवेची भावना आहे आणि ते पूर्ण समर्पित होऊन काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here