Home मनोरंजन “जात “….. साली जाता जात नाही!

“जात “….. साली जाता जात नाही!

545
0

अवधूत गुप्तेचं “जात ” रॅप सॉंग चा ट्रेलर लॉन्च

मुंबई : गायक, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, जज अशा अनेक रुपातून अवधूत गुप्ते आपल्याला दिसला आहे. प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न अवधूत गुप्ते करत असतो. आताही त्याच्या नव्या गाण्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अवधूतचं हे नवं गाणं त्याच्या नेहमीच्या गाण्यांपेक्षा अतिशय वेगळं आहे. मराठीमध्ये रॅप साँग हा प्रकार तसा नवीनच आहे. अवधूतचं नवं गाणं रॅप साँग आहे.

“जात ” मधून सामाजिक संदेश :

अवधूत गुप्तेच्या नव्या गाण्याचं नाव ‘जात’ असं आहे. या गाण्यातून त्याने जाती व्यवस्थेवर भाष्य केलं आहे. या गाण्यात सामाजिक संदेश देण्याचा अवधूतचा प्रयत्न आहे. या गाण्याचे गीतकार समीर सावंत आहेत तर संगीतकार विक्रम बाम आहेत. या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी आशा अवधूतने व्यक्त केली आहे.

ऐका दाजीबा, मधुबाला अशी अनेक गाणी त्याने आजपर्यंत गाजवली आहे. झेंडा, कान्हा, बॉइज, रेगे, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मोरया असे त्याचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. आता जात या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here