Home मनोरंजन ११ वर्षांनी लहान झैद दरबार शी लग्न करणार गौहर खान !

११ वर्षांनी लहान झैद दरबार शी लग्न करणार गौहर खान !

357
0

मुंबई : अभिनेत्री गौहर खान ही अभिनेत्री टेलिव्हिजन विश्वात नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस ची विजेती म्हणून आणि वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत असते. आता ही अभिनेत्री इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबार याच्याशी लग्न करणार आहे. 25 डिसेंबर रोजी गौहर आणि झैद निकाह करणार आहे. झैद दरबार आणि गौहरने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर असणारा झैद दरबार हे नाव सोशल मीडियावरील प्रसिद्ध नाव आहेझैदने सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. झैद गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. गौहर खान आणि अभिनेता कुशाल टंडन दीर्घकाळासाछी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते टिकले नाही. कुशाल देखील बिग बॉस प्रतिस्पर्धी होता. शोमध्ये देखील त्यांची केमिस्ट्री दिसून यायची पण त्यांनी कालांतराने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

https://www.instagram.com/p/CIPpCqdlL2j/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here