Home मनोरंजन अभिनेता सोनू सूद राजकारणात….

अभिनेता सोनू सूद राजकारणात….

144
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : लॉकडाऊन दरम्यान हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करत होता त्यावेळी अनेक राजकारणी लोक देखील त्याला भेटत होते आणि अनेक राजकीय पक्षांकडून त्याला ऑफर आल्या होत्या. यामुळे एक चर्चा अशी होती की, तो राजकारणात प्रवेश करणार आहे. मात्र, यासर्वांवर आता सोनू सूदने स्वत: सांगितलं आहे
एक अभिनेता म्हणून मला अजून खूप पुढे जायचे आहे. मी जी स्वप्ने पाहिली ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत आणि मला असे वाटते की, मी प्रथम ते पूर्ण करणे आवश्यक आहे. राजकारणात येण्यासाठी कुठलाही विशिष्ट वेळ ठरलेला नसतो आणि राजकारणामध्ये येण्याचा विचार मी पाच ते दहा वर्षांनंतर करेल.
ज्या गोष्टींमध्ये मी एक्सपर्ट आहे त्या गोष्टी मी अगोदर केल्या पाहिजेत मी जर सध्याच राजकारणात प्रवेश केला तर गावोगावी जाऊन लोकांना मदत करू शकणार नाही. म्हणून मी आताच राजकारणात प्रवेश करणार नाही कारण मी त्या पदाला सध्या न्याय देऊ शकत नाही. आता एक अभिनेता म्हणून खूप काही करायचे राहिले आहे आणि आता मी ते करण्याचा प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here