Home गडचिरोली गडचिरोली, चंद्रपुरात तसेच तेलंगणा राज्यात भूकंपाचे सौम्य धक्के; ३.१ स्केलची नाेंद

गडचिरोली, चंद्रपुरात तसेच तेलंगणा राज्यात भूकंपाचे सौम्य धक्के; ३.१ स्केलची नाेंद

256
0

गडचिरोली:मंगळवारी सकाळी ८:४२ च्या सुमारास तेलंगणा राज्यातील शिरपूर, कागजनगर परिसरासह १० किमी सीमावर्ती भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. गोदावरी फौल्टमध्ये हा भूकंप झाला असून हे भूकंप प्रवण केंद्र आहे. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल असून जमिनीच्या आत ५ किमी खोल भूकंप झाला आहे. हा सौम्य धक्का असला तरी याचे धक्के चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी परिसरात व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) गावाला सुद्धा जाणवले. गडचिराेलीतील आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यालयात यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा देतानाच नाशिक केंद्राने अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसल्याचे सांगितले.तर अर्थक्वेक पोर्टलने भूकंपाचे सौम्य धक्के शिरपूर, कागजनगर परिसरात जाणवल्याचे म्हटले आहे. चंद्रपूर येथील या विषयाचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनीही गोदावरी फौल्टमध्ये भुकंपाचे धक्के बसले असल्याचे सांगितले. महागाव (बु.) गावातील काही नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून अहेरी येथील समाजमाध्यमकर्मींना ही माहिती दिली. हे अत्यंत सौम्य धक्के असल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे आपत्ती विभागाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here