Home मनोरंजन ‘भिडे तुझी पोरगी वाया गेली’ ; निधीचे स्वीमसूट फोटो बघून युझर्सची प्रतिक्रिया

‘भिडे तुझी पोरगी वाया गेली’ ; निधीचे स्वीमसूट फोटो बघून युझर्सची प्रतिक्रिया

670
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये सोनू भिडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या निधि भानुशालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपली स्टाइल पूर्णपणे बदललेली दिसत आहे. निधी गोव्यात सुट्टीचा आनंद लुटत होती. त्याच दरम्यान तिने हे फोटो शेअर केले.निळ्या आणि काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये ती समुद्राच्या निळ्याशार लाटांचा आनंद घेताना या फोटोजमध्ये दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘मी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीचा आनंद घेत आहे.’तिचे असे हॉट फोटो पाहून मालिकेतली सोनू हीच का असा प्रश्न चाहत्यांना पडतो.तिच्या गोव्यातील एका फोटोवर चाहत्याने लिहिले की, ‘भिडे सर, तुमची मुलगी हाताबाहेर गेली आहे.

२०१२ पासून २०१९ पर्यंत अशी ७ वर्षे निधीने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेंची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर निधीने हि मालिका सोडली.आता पलक सिंधवानी सोनूची भूमिका साकारत आहे.

निधी भानुशाली चे फोटोज बघण्याकरिता खालील लिंक वर लिंक करा

https://www.instagram.com/p/CFw40UFBeId/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here