Home महाराष्ट्र मनसेला जोरका झटका , एकाच वेळी 320 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मनसेला जोरका झटका , एकाच वेळी 320 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

513
0

पदं देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही….

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत खळबळ उडाली आहे. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे मनसेमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उपशहराध्यक्ष, विभागीय संघटक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष अशा एकूण 320 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या लोकांना मोठी पद देण्यात आली असून आधी त्यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडला होता, अशी नाराजी कल्याण पूर्वमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच हे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता परत त्यांची घरवापसी झाली आहे. पक्षात परत आल्यानंतर त्यांची कल्याण पूर्व विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यापाठोपाठ कल्याण पूर्व डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधील सात ते आठ जणांना पदे बहाल करण्यात आली आहेत. पण, पक्ष सोडून गेलेला व्यक्ती पक्षात परत आल्यानंतर मोठ्या पदावर नियुक्ती केल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पदे देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोपच पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उपशहर अध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुपूर्द केले आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये 5 शाखाध्यक्ष, 2 विभागीय संघटक, 4 विभाग अध्यक्ष, सहा उपविभाग अध्यक्ष, 58 उपशाखा अध्यक्ष, तसंच 234 गट अध्यक्ष आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here