Home व्यवसाय नविन लोगोसह नोकिया ग्राकांचा भेटीस

नविन लोगोसह नोकिया ग्राकांचा भेटीस

220
0

जगप्रसिद्ध मोबाईल ब्रँड असलेल्या नोकिया कंपनीने आपल्या लोगोत बदल केला आहे. खूप वर्षांपासून नोकियाचा एकच लोगो होता. मात्र, कंपनीने आता ५ वेगवेगळ्या डिझाईन वापरुन हा लोगो बनवला आहे. नवीन लोगोसह मार्केटमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचे संकेतच कंपनीने दिले आहेत. रंगीत आणि वेगवेगळ्या ५ डिझाईन एकत्र करुन NOKIA हा शब्द लोगो बनून तयार झाला आहे. यापूर्वीचा लोगो केवळ निळ्या व पांढऱ्या रंगात अतिशय साधारण होता.
नोकिया कंपनीने काही दिवसांपूर्वीच Nokia G22 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Nokia G22 ची बॅटरी, डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट या प्रत्येक गोष्टीला ग्राहक घरीच ठीक करु शकतात. त्यासाठी, मोबाईल फोनसोबत कंपनीकडून i Fixit किटही देण्यात येते. या किटद्वारे आपण मोबाईल फोनमधील कुठलाही पार्ट सहजपणे बदलू शकतात.

नोकिया कंपनीचा Nokia 11 हा फोन जगातील सर्वाधिक विक्री झालेला फोन ठरला आहे. या फोनचे जगभरात २५० मिलियन्स म्हणजेच २५ कोटी युनिट्स विक्री करण्यात आले होते. कंपनीने २००३ मध्ये Nokia 11 हा फोन लाँच केला होता. सहज वापरता येणारा आणि टिकायला दमदार असल्याने या फोनची सहजच विक्री झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here