Home क्राइम नवीन वर्षातच वाहनांची तोडफोड …

नवीन वर्षातच वाहनांची तोडफोड …

493
0


मराठवाडा साथी न्यूज
पुणे : पुण्यामधील पिंपरी-चिंचवड परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड झाली आहे.नववर्षाचं सेलिब्रेशन करताना मद्यपान केलेल्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. दोन गटातील आरोपींनी कोयत्याने सहा वाहनांची तोडफोड केली. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मोहन नगर चिंचवड येथे ही घटना घडली.अल्पवयीन मुलासह १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन नगर चिंचवड या ठिकाणी नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काही तरुण एकत्र होते. त्यांनी मद्यपान केलं. परंतु, किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. यातूनच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सहा चारचाकी आणि रिक्षांचा काचा फोडल्या आहे. नागरिकांमध्ये मात्र पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here