Home राजकीय मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

305
0

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून नागपूरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा घेण्यात येणार आहे. १६ एप्रिल रोजी दर्शन कॉलनीतील मैदानावर ही सभा पार पडेल. दरम्यान, या सभेला भाजपाकडून विरोध करण्यात येत असून यावरून देवेंद्र फडणवीसांनीही खोचक टीका केली आहे. वाशिममधील सभेत बोलताना मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली आहे, असं ते म्हणाले. फडणवीसांच्या या टीकेला आदित्य ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
भाजपाची ‘वज्रमूठ’ ही विकासाची ‘वज्रमूठ’ आहे. तर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही तडा गेलेली आहे. महाविकास आघाडीचे तीन तोंड तीन वेगळ्या दिशेला आहे. त्यांचा एक भोंगा सकाळी ९ वाजता वाजतो. दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी १२ वाजता वाजतो. तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळंच काहीतरी बोलतो. त्यामुळे हे लोक राज्यातील जनतेसाठी काहीही करू शकत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

आदित्य ठाकरेंनीही दिलं प्रत्युत्तर
फडणवीसांच्या या टीकेला आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठे’ला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. देशातील लोकशाही आणि संविधान टिकावं, हाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असं ते म्हणाले.

मविआच्या सभेला अटी-शर्थीसह परवानगी
दरम्यान, मविआच्या नागपूरमधील सभेला क्रीडा मैदान बचाव समितीचे शर्मा यांनी विरोध केला होता. या मैदानात लाखो कार्यकर्ते बसू शकणार नाहीत, गर्दी रस्त्यावर येईल. त्यामुळे ही सभा गैरकायदेशीर असल्याचे शर्मा यांचं म्हणणे होतं. तसेच त्यांनी याबाबत नागपूर सत्र न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने अटी व शर्तीसह सभेला परवानगी दिल्याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here