Home नागपूर निवडणुकीसाठी अपहरण…

निवडणुकीसाठी अपहरण…

88
0


नागपूर: ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या ७५ वर्षीय उमेदवाराचे अपहरण करून त्याला अर्ज मागे घेण्यात बाध्य करण्यात आल्याची घटना हिंगण्यातील पेठ येथे सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.बाल्या बावणे, दीपक करवा, पुरूषोत्तम सोनवणे (सर्व रा. पेठ) ही अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. रामभाऊ सर्वेलाल पवार (वय ७५ रा.पेठ) यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी ही कारवाई केली.पेठ ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक आहे. रामभाऊ पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलाआहे.
४ जानेवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख होती. सकाळी दहा वाजताच्या सुमारास बाल्या, दीपक, पुरूषोत्तम व मनोहर येलेकर (रा. धामना) या चौघांनी रामभाऊ यांना बळजबरीने कारमध्ये बसविले. चौघे त्यांना घेऊन सिव्हिल लाइन्समधील तहसील कार्यालयात आले. रामभाऊ यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास बाध्य केले. रामभाऊ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. चौघे त्यांना घेऊन परत पेठ येथे आले. त्यानंतर रामभाऊ यांनी हिंगणा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here