Home राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात माहिती:कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात माहिती:कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान

230
0

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यामुळे विधीमंडळात गोंधळ झाला यावर बोलताना कांदा उत्पादकांना ३००रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांकडूनअनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तर नाशिकमधून किसान मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तार हे असंवेदनशील मंत्री आहेत, अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये, तर दुसरीकडे सत्तार म्हणतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या रोजच्या आहेत. त्यात नवे काय हे संवेदना हीन कृषीमंत्री आहेत असा टोला भुजबळांनी लगावला आहे.भुजबळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना १२०० रुपये क्विंटल खर्च येत आहे, तर कांदा विकून केवळ त्यांच्या हातात ५०० ते ६०० रुपये पडतात म्हणून सरकारने५०० रुपये तरी अनुदान द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली असून सरकार केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे, असा आरोप भुजबळांनी केला आहे.दिंडोरी येथील नवीन कांदा मार्केट पासून मोर्च्यास सुरुवात करण्यात आली, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्च्यांचे स्वागत तालुकाध्यक्ष अप्पा वाटणे,देविदास वाघ यांनी केले, यावेळी रस्ता अडवत रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांचे नेतृत्वाखाली या प्रलंबीत मागण्या सोडण्यासाठी दिनांक १२ मार्च २३ पासून दिंडोरी ते मुंबई असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च आयोजित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here