Home गंगाखेड कोव्हिशिल्ड व कोवँक्सिसन लशीला परवानगी देणारे सोमाणी परभणीचे

कोव्हिशिल्ड व कोवँक्सिसन लशीला परवानगी देणारे सोमाणी परभणीचे

691
0

गंगाखेड
जगात जर्मनी, भारतात परभणी.. ही म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच. या म्हणीचा प्रत्यय रविवारी (दि. 3) देशवाशीयांना आला. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्राने देशात कोरोनाच्या दोन लसींना परवानगी दिल्याची घोषणा केली. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ( DCGI) कोरोना प्रतिबंधात्मक 2 लसींना परवानगी दिली आहे.डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिल्याचे जाहीर केले. देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. गेल्या वर्षभरापासून चिंताग्रस्त असलेल्या देशवासीयांच्या जीव या घोषणेने भांड्यात पडला आहे. वेणूगोपाळ सोमानी हे मूळचे मराठवाड्यातील दुष्काळी भागातील परभणीचे असून सध्या ते DCGI चे संचालक बनून दिल्लीत कार्यरत आहेत. वेणूगोपाळ याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही परभणी जिल्ह्यातच झाले आहे. पुढे त्यांनी उच्च शिक्षण M. Pharm आणि Ph. D नागपूर विद्यापीठातून पूर्ण केली आहे. काही कालावधीनंतर Central Drugs Standard Control Organisation सोबत काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास 2019 पर्यंत DCGI (Drugs Controller General of India) पदापर्यंतत पोहोचला. डॉ. व्ही. जे सोमानी यांनी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली अशा ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर यशस्वी कामगिरी केली आहे. डॉ. सोमानी सध्या धोरण तयार करणं, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया, नियामक प्रक्रियेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here