Home औरंगाबाद जादूटोणा करणाऱ्या परप्रांतीय भामट्यांना क्रांती चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जादूटोणा करणाऱ्या परप्रांतीय भामट्यांना क्रांती चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2790
0

औरंगाबाद : तंत्रमंत्र सम्राट मिया मुसाजी नावाने कौटुंबिक अडचणींवर जादूटोणा करून उपचार करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळणाऱ्या दोन परप्रांतीय भामट्यांना क्रांती चौक पोलिसांनी छापा मारून पकडले. ही कारवाई महसुल प्रबोधनी समोर, गौतमनगर, लक्ष्मी टॉवर गाळा क्र. ३ येथे शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता करण्यात आली. शहजाद अन्सारी निरास अन्सारी (२६) आणि मोहम्मद नईम मलीक मोहम्मद यामीन (४०, दोघेही रा. इंचोली, मेरठ, उत्तर प्रदेश) असे अटकेतील भामट्यांची नावे आहेत.महसुल प्रबोधनी समोर एका गाळ्यात तंत्रमंत्र सम्राट मिया मुसाजी नावाने एक बाबा, वशीकरण, मुठ करणी, शत्रुनास, सैतान प्रॉब्लेग, व्यसनमुक्ती, कोर्ट केस, घटस्फोट, सासु सुना भांडण, संतान प्रॉब्लेम, प्रॉपर्टी विवाद, यावर उपचार, उपाय करण्याच्या नावाखाली जादूटोणा करून लोकांकडून पैसे उकळून फसवणूक करत असल्याची माहिती क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी उपनिरीक्षक संतोष राउत, महादेव गायकवाड, सहायक फौजदार नजीम खान, जमादार मंगेश पवार, पोलीस नाईक नरेंद्र गुजर, अनंत कुलकर्णी, शिपाई कृष्णा चौधरी यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने लक्ष्मी टॉवर इमारती समोर गाळा क्र.३ छापा मारला. यावेळी शाहजाद अन्सारी हा रजिस्टरमध्ये येणाऱ्या लोकांची नावे लिहून पैशांची नोंद करत होता. तर  एका बॉक्स मध्ये व्हिजीटींग कार्डस ज्यावर तंत्र मंत्र सम्राट मिया मुसाजी असे लिहीलेले साहित्य बाळगून होता. तर आतल्या खोलीत मोहम्मद यामीन हा छोटा टेबल ठेवून त्यावर लिंबु, अगरबत्ती, फुले, टाचण्या, दोरा बंडल, ताट, ज्यामधे चिल्लर पैसे, चाकु, प्लॉस्टीकचे बरण्यामध्ये जादु टोण्याचे इतर साहित्य घेवुन बसलेला दिसून आला. भिंतीवर देवतातांचे फोटो ठेवलेले होते. त्याची कसून चौकशी केली असता त्याने जादुटोणा करुन लोकांचा इलाज करतो त्यासाठी लोकांकडुन सुरुवातीला २५० रुपये घेऊन नंतर परत बोलावून. ४ हजार ते १० हजार रुपये घेत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here