Home क्रीडा IND vs AUS : विराटच्या वन – डे मध्ये 11,977 धावा ,23...

IND vs AUS : विराटच्या वन – डे मध्ये 11,977 धावा ,23 रनने मोडू शकतो तेंडुलकरचा विक्रम

724
0

ऑस्ट्रेलिया: कॅनबेरा वनडेमध्ये विराट वनडेमध्ये सगळ्यात जलद 12 हजार रन पूर्ण करणारा खेळाडू ठरू शकतो. सध्या हा विक्रम सचिनच्या नावावर आहे आणि विराटला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 23 रनची गरज आहे. तेंडुलकरने 309 वनडेच्या 300 इनिंगमध्ये 12 हजार रन पूर्ण केले होते. तर कोहलीने 250 वनडेमध्येच 11,977 रन केले आहेत. जर कोहलीने बुधवारी 23 रन जास्त केले, तर तो सचिनच्या तुलनेत 58 मॅच आधीच हा विक्रम मोडेल.

या यादीमध्ये सचिननंतर रिकी पॉण्टिंगचा नंबर आहे. पॉण्टिंगने 323 मॅचच्या 314 इनिंगमध्ये, कुमार संगकाराने 359 मॅचच्या 336 इनिंगमध्ये, सनथ जयसूर्याने 390 मॅचच्या 379 इनिंगमध्ये आणि महेला जयवर्धनेने 426 मॅचच्या 399 इनिंगमध्ये 12 हजार रन पूर्ण केले ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया चा पराभव झाला आहे. आता कॅनबेरामध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेमध्ये विराट ची टीम व्हाईट वॉश टाळण्यासाठी मैदानात उतरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here