Home मनोरंजन पत्नी सोबतचा क्युट फोटो शेअर करत;चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’…!

पत्नी सोबतचा क्युट फोटो शेअर करत;चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’…!

717
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर यांना ख्रिसमस च्या निमित्ताने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. शशांक लवकरच ‘बाबा’ होणार आहे.त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी प्रियांकाबरोबरचा एक क्युट फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. प्रियांका-शशांकच्या या क्युट फोटोवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

२०१७ मध्ये प्रियांका आणि शशांक यांचा विवाह झाला होता. दरम्यान,शशांकने ही पोस्ट शेअर करताना असे म्हटले आहे की, ‘आम्हाला हे माहित होते,सँटा येतो आणि गिफ्ट्सचा वर्षाव करतो. पण आम्हाला हे माहित नव्हते की, आम्हालाही एक गिफ्ट मिळेल त्याकरिता आम्ही आभारी आहोत. आम्हा तिघांकडूनही हॉलिडे सीझनच्या शुभेच्छा’.

https://www.instagram.com/p/CJNVNU9JUn7/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here