Home छत्रपती संभाजी नगर सेल्फी’च्या गाण्यात दिसणार जॅकलिन;लवकरच गाण रिलीज

सेल्फी’च्या गाण्यात दिसणार जॅकलिन;लवकरच गाण रिलीज

420
0

छत्रपती संभाजीनगर:अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र तो पूर्णपणे आपटला. या चित्रपटात त्याच्यासोबत इम्रान हाश्मीदेखील आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे, जॅकलिन फर्नांडिस अक्षय आणि इमरानसोबत एका गाण्यात दिसणार आहे. मात्र, हे गाणे चित्रपटाच्या कथेचा भाग नसल्यामुळे निर्माते आता ट्रॅक रिलीज करण्याचा विचार करत आहेत. या गाण्याचे शूटिंग बिकानेरमध्ये झाले आहे. जॅकलीन आणि अक्षयने यापूर्वी ‘राम सेतु’ आणि ‘बच्चन पांडे’मध्ये सोबत काम केले आहे. दुसरीकडे, इम्रानसोबत जॅकलीन ‘मर्डर २’मध्ये दिसली आहे. ‘सेल्फी’ विषयी बोलायचं झालं तर अक्षय आणि इम्रान शिवाय डायना पेंटी आणि नुसरत भरूचा देखील आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत फक्त १० कोटी रुपयाची कमाई केली आहे. ‘सेल्फी’ २०१९ मध्ये आलेल्या मल्याळम ‘ड्रायविंग लायसेन्स’चा अधिकृत रिमेक आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here