Home मुंबई सिलिंडर घरी नेण्यासाठी लागतात ५० रुपये जास्त ….

सिलिंडर घरी नेण्यासाठी लागतात ५० रुपये जास्त ….

513
0
#gas

मराठवाडासाथी न्यूज

मुंबई : रोजच्या घरगुती जीवनात मह्त्वाची गरज म्हणजे गॅस आणि गोरगरीब महिलांची चूल आणि त्यापासून उद्भविणाऱ्या धुराच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी गरजू कुटुंबांना उज्ज्वला योजनेद्वारे विनामूल्य घरगुती गॅस पुरविण्याचे राष्ट्रीय धोरण आहे. मात्र वितरणातील अनियमिततेमुळे ग्रामीण भागांतील रहिवाशांचे शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड तालुक्यात आढळून आला आहे. घरगुती गॅस सिलिंडर घरपोच देण्यासाठी ग्राहकांकडून तब्बल ५० रूपये अधिक घेतले जात असल्याचे काही स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.ग्रामीण भागांत फारसे ग्राहक नसल्याने एजन्सीचालक काही विशिष्ट गावांपर्यंतच सिलिंडर आणून देतात. त्या ठिकाणांहून पंचक्रोशीतील ग्रामस्थांना त्यांचा सिलिंडर खासगी वाहनाद्वारे घरी न्यावा लागतो. अनेकदा सिलिंडर वितरण करण्याची ठिकाणे बदलली जातात. त्यामुळे ग्रामस्थांना बरीच धावपळ करावी लागते. गावात घरपोच सिलिंडर आणून दिला तर ५० रुपये अधिक द्याावे लागतात. खरेतर एजन्सीपासून १५ किलोमीटरच्या परिघात छापील किमतीएवढीच रक्कम घेण्याचा नियम आहे. वाहतूक खर्च त्यातच अंतर्भूत असतो. मात्र या वस्तुस्थितीबाबत अनेक ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत.गॅस सिलिंडरचे पैसे दिल्यानंतर त्याबद्दल छापील पावती दिली जात नाही. सिलिंडरमध्ये १४ किलो २०० ग्रॅम वायू असतो. प्रत्यक्षात पडताळणी केली असता मुरबाडमध्ये काही ठिकाणी किमान ५०० ग्रॅम कमी वायू वितरित केला जात असल्याचे आढळून आले आहे. गेली अनेक वर्षे अधिक किंमत आकारणे आणि कमी इंधन वायू पुरवणे अशा पद्धतीने दुहेरी भ्रष्टाचार सुरू आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार करीत असल्याचा आरोप असणाऱ्या एजन्सी व्यवस्थापकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
इंधन वायू सिलिंडरची किंमत ५९९ रूपये आहे. १५ किलोमीटरच्या परिघात तितकीच रक्कम घेणे क्रमप्राप्त आहे. या संदर्भात वाढीव पैसे घेत असल्याची लेखी तक्रार केल्यानंतर संबंधित एजन्सी व्यवस्थापकाने ते मान्य केले. वितरण व्यवस्थेत ग्रामीण भागांतील लोकांचे अज्ञान आणि भोळेपणाचा फायदा घेऊन वाहन चालक जादा पैसे घेत असतील, तर ते चूक आहे, हेही त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ५९९ रूपयेच द्यावेत. सिलिंडरमधील वायू १४.२ किलो आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. वजन काटा एजन्सी उपलब्ध करून देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here