Home इतर भारतीय क्रिकेटपटूंचा भाजप मध्ये प्रवेश…!

भारतीय क्रिकेटपटूंचा भाजप मध्ये प्रवेश…!

624
0

मराठवाडा साथी न्यूज

कोलकाता : भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांची भेट घेतली. दोघांमध्ये एक तास चर्चा सुरु होती . या भेटीनंतर सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे . परंतु राजभवनशी संबंधित सूत्रांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. या भेटीनंतर राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आज राजभवनावर सौरव गांगुली यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

सौरव गांगुली हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची शक्यता आहे. “बंगालचा भूमीपुत्रच पश्चिम बंगाचा पुढील मुख्यमंत्री असेल,” असं वक्तव्य अमित शाह यांनी आपल्या कोलकाता दौऱ्यामध्येच केलं होतं. अमित शाह ज्या भूमिपुत्राबद्दल बोलत आहेत ते सौरव गांगुलीच आहेत का अशी अटकळ बांधली जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या वैशाली दालमिया यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती. वैशाली दालमिया सौरव गांगुली यांच्या निकटवर्ती समजल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here