Home राजकीय ईडीच्या समन्सला वकिलामार्फत उत्तर देणार’;आमदार हसन मुश्रीफ

ईडीच्या समन्सला वकिलामार्फत उत्तर देणार’;आमदार हसन मुश्रीफ

396
0

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिस-यांदा छापेमारी केल्यानंतर तब्बल ५२ तासांनी थेट कागलमध्ये दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस मुश्रीफ संपर्क क्षेत्राबाहेर होते. कागलमध्ये दाखल होताच हसन मुश्रीफांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी कागलमध्ये आलो असलो तरी ईडीच्या चौकशीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच माझ्यावतीने वकील भूमिका मांडतील असेही ते म्हणाले .मुश्रीफ म्हणाले की, “पहिल्या केसमध्ये माझे नावच नव्हते. ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्याप्रकरणी मला समन्स बजावण्यात आलय अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली. तसेच, माझे वकील ईडीला मुदतवाढीची मागणी करणार आहेत. मी बाहेर गावी गेलो होतो. मी हजर नव्हतो त्यावेळी ईडीचे पथक माझ्या घरी आले होते. ईडीच्या चौकशीने झालेली अवस्था पाहण्यासाठी कुटूंबाची भेट घेण्यासाठी मी आज कागलमध्ये आलो होतो.” असे मुश्रीफ यावेळी म्हणाले.हसन मुश्रीफ त्यांच्या विविध कंपन्यांमार्फत झालेल्या कथेत घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. दीड महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफ राहत असलेल्या कागल इथल्या निवासस्थानी ईडीने छापा टाकून दिवसभर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. तसेच कुटुंबीयांची देखील कसून चौकशी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्थांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यामार्फत कथित घोटाळा झाल्याची तक्रार ईडीकडे प्राप्त झालेली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here