Home परभणी आजार होण्यापूर्वीच आरोग्य तपासणी करणे काळाची गरज- डॉ.मनीष बियाणी

आजार होण्यापूर्वीच आरोग्य तपासणी करणे काळाची गरज- डॉ.मनीष बियाणी

राजस्थानी मल्टीस्टेट व संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ.मनिषा बियाणी यांनी मार्गदर्शन केले.

275
0

मराठवाडा साथी न्यूज

गंगाखेड: नागरिकांचे जीवन हे धावपळीचे झाल्याने प्रत्येक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आसल्याचे दिसुन येत आहे.लहान लहान आजारा कडे डॉक्टरांचा सल्ला न घेताच औषधी घेण्याचे प्रमाण वाढत आहे.यामुळे तात्पुरता आजार बरा होतो पण पुर्णपणे बरा होत नाही. याचे गंभीर परिणाम तोच आजार जास्त झाल्यावर दिसुन येतो.

त्यासाठी आरोग्य तपासणी करणे ही काळाजी गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ.मनिषा बियाणी यांनी राजस्थानी मल्टीस्टेट व संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये केले.

राजस्थानी मल्टीस्टेट व संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था आधार माणुसकीचा आणी स्पार्क लाईफ केअर मुंबई यांचा संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार रोजी राजस्थानी मल्टीस्टेट बँकेचा प्रांगणात घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ अस्थीरोग तज्ञ डॉ.मनीष बियाणी यांचा हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी राजेंद्रप्रसाद बियाणी होते.

 प्रमुख पाहुणे म्हणुन अनील बियाणी रामदास कुकडे सुनील जाधव नवनाथ पांचाळ बँक व्यवस्थापक अशोक भोसले उपस्थित होते. तर,आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक मोरे,प्रंशात पाँल,डॉ.दिपक सोनवने विक्रांत मोरे उपस्थित होते.या मोफत आरोग्य तपासणी शिबीरा मध्ये नाडी परिक्षण ब्लड प्रेशर,ईसीजी नेञ चिकित्सा डायबेटीज बी.एम.आय व बाडी फँट तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना डॉ.बियाणी म्हणाले की वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यासाठी  सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतल्यास सर्वसामान्य नागरिकांचा आरोग्य तपासणीतुन आजाराची लक्षणे लवकर कळाल्यास यावर उपचार पण लवकर होउन आजार मुक्त होता येईल.आजही कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नसून प्रतिबंधक लस येई पर्यत प्रत्येक नागरिकांनी शासनाचे नियम पाळणे गरजेचे आहे.या शिबीरात नागरिकांनी आरोग्य तपासणी करीता मोठी गर्दी केली होती.अनेकांनी आरोग्य तपसणीचा लाभ घेतला आरोग्य शिबीर यशस्वीसाठी बँकेचे गजानन उदावंत, दिपक चाफळे,गजानन एडके रमेश अंबुरे,दताञय भिसे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here