Home अपघात बातमी २ कोटींसाठी त्याने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला

२ कोटींसाठी त्याने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला

351
0

मुंबईः २ कोटींच्या विमाच्या पैशांसाठी एका डॉक्टरने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरला अटक केली आहे. तर, या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला लुकआउट नोटिस जारी केली आहे.

विम्याचे दोन कोटी मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव करणाऱ्यांचे नाव दिनेश टाकसाळ असं असून त्याला अनिल लटके आणि विजय माळवडे यां दोघांनी मदत केली होती. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तसंच, पोलिस खात्यातील एका हवालदाराच्या मदतीने बनावट कागदपत्रेही बनवण्यता आली होती. या हवालदाराच्या नावे पोलिसांनी लुकआऊट नोटिस जारी केली आहे. त्याचबरोबर, डॉ. विशाल केवरे हे अहमदनगर येथील आरोग्य विभागाच्या अधीक्षकांनी दिनेशचा खोटा मृत्यूचा दाखला तयार केला होता. त्या मृत्यूदाखल्यात त्यांनी टाकसाळ याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला होता.

बनावट मृत्यूचा दाखला तयार केल्यानंतर रस्ते अपघातात मृत्यू झालेला व्यक्ती टाकसाळचं असल्याचा दावा नोंदवण्यात कॉन्स्टेबर कैलास देशमुख यांनी मदत केल्याचा संशय आहे. देशमुख हे घारगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. मात्र, त्यांचे नाव समोर आल्यापासून ते फरार झाले आहेत.

सुरुवातीला अपघातग्रस्ताच्या मृतदेह समोर आल्यानंतर एका महिलेने समोर येऊन हा दिनेशचाच मृतदेह असल्याचा दावा केला होता. तसंच, ती दिनेशची आई असल्याचंही तिने म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात हाही एक बनाव असून दिनेशच्या जन्मदात्या आईला याबाबत काहीच माहिती नसल्याचं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे. तसंच, पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी रस्ते अपघातात मरण पावलेला व्यक्तीहा दिनेश असल्याचं सांगत बनावट मृत्यू दाखला दिला होता. मात्र, तो मृतदेह दुसऱ्याच एका व्यक्तीचा असल्याचे समोर आलं आहे.

पोलिस, हा मृतदेह कोणाचा होता याचा तपास करत आहेत. या सर्व प्रकरणाचा फरार पोलिस कॉन्स्टेबलचं उलगडा करु शकतात. तसंच, हा अपघात होता की विम्यासाठी दिनेश आणि त्याच्या साथीदाराने कोणाची तरी हत्या घडवून आणली असेल व अपघात असल्याचं भासवले असेल, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here