Home Uncategorized उन्हाळ्यात पक्षांच्या चारा-पाण्याची एकत्र व्यवस्था असलेल्या १०१ भांड्यांचे वितरण

उन्हाळ्यात पक्षांच्या चारा-पाण्याची एकत्र व्यवस्था असलेल्या १०१ भांड्यांचे वितरण

2062
0

स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा उपक्रम

परळी । पर्यावरणाच्या ऱ्हासाचा फटका व वाढत्या तापमानवाढीच्या स्थितीमुळे पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राधा-मोहन साथी प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात पक्षांची गैरसोय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. निसर्गचक्र टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे अस्तित्व असणे गरजेचे आहे.

दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांचा येत्या महाशिवरात्रीला स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्र येथे गुरूवार, दि.११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चारा-पाणी ठेवण्यासाठी उपयुक्त असलेल्या भांड्यांचे वाटपही करण्यात येणार आहे. चारा-पाणी एकत्रच ठेवता येईल असे खास 101 भांडी बनवून घेण्यात आले आहेत. पक्षीप्रेमी नागरीकांना बचपन प्ले स्कुलच्या बाजुला असलेल्या स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र येथून ही भांडी मोफत घेवून जाता येणार आहेत. मात्र भांडे घेवून गेल्यानंतर दररोज न चुकता पक्षांसाठी चारा आणि पाणी या भांड्यात ठेवण्याची हमी द्यावी लागणार आहे.

भांडी मोफत मिळणार

दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पक्षांसाठी चारा आणि पाणी ठेवण्यासाठी उपयुक्त असलेल्या १०१ भांड्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. ज्या नागरीकांना पक्षीसेवेची आवड आहे व जे दररोज या भांड्यांमध्ये न चुकता पाणी आणि चारा टाकण्याची दयारी दर्शवणार आहेत त्यांनाच ही भांडी मोफत दिली जाणार आहेत. उन्हाळ्याचा काळ हा पक्षांसाठी कठीण काळ असतो, चारा-पाण्यावाचून त्यांचे हाल होतात. त्यांच्या सोयीसाठी हा उपक्रम राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here