Home मुंबई बिअर प्रेमींसाठी खुशखबर ! आता घरबसल्या तयार करा दोन मिनिटात थंडगार बिअर

बिअर प्रेमींसाठी खुशखबर ! आता घरबसल्या तयार करा दोन मिनिटात थंडगार बिअर

600
0

मुंबई : उन्हाळ्यात थंड पेयासोबत बिअरची मागणी वाढलेली असते. मद्य शौकीन गर्मीच्या दिवसात बिअरला पसंती देतात. दारु पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असूनही मद्यप्रेमी पिणे सोडत नाहीत. बिअरमध्ये देखील अल्कोहोल असते, त्यामुळे बिअरची स्वतंत्र दुकाने किंवा वाईन शॉप येथेच ती मिळते. अनेकदा दुकानातून घरी आणताना बिअर गरम होते. त्यामुळी पुन्हा थंड होईपर्यंत वाट पाहावी लागते. पण आता या समस्यांवर जर्मनीतील एका कंपनीने उपाय शोधला असून त्यांनी बिअर पावडर तयार केली आहे. या बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही सहज घरच्या घरी अवघ्या दोन मिनिटांमध्ये थंडगार बिअर तयार करु शकता. हे ऐकून खोटं वाटत असले तरी हे खरं आहे. जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे. याआधी कधीही पावडर स्वरूपात बिअर बनवली गेली नव्हती.

बनवा झटपट बिअर
तुम्ही फक्त दोन चमचे पावडर थंड पाण्यात मिसळा आणि तुमची थंडगार बिअर तयार आहे. यासोबतच हे पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही.

जगातील पहिल्या बिअर पावडरचा शोध
जर्मन न्यूज वेबसाईट डीडब्ल्यूमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पूर्व जर्मनीमध्ये ही बिअर पावडर बनवण्यात आली असून ही बिअर पावडर हा अशा प्रकारचा पहिला शोध आहे. या आधी कुणीही पावडर स्वरूपात बिअर बनवली नव्हती. पूर्व जर्मनीमधील नोएटसेल ब्रुअरी कंपनीने ही बिअर पावडर तयार केली आहे. ही बिअर पावडर बनवणाऱ्या नोएटसेल ब्रुअरीने सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस ही बिअर पावडर बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

दोन मिनिटांत बिअर
बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही दोन मिनिटांत तुमची बिअर तयार होईल. बिअर बनवणाऱ्या कंपनीनं सांगितलं की, तुम्ही ही बिअर पावडर खरेदी करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा यापासून बिअर बनवून त्याचा आनंद घेऊ शकता. दोन चमचे बिअर पावडर बाटलीत किंवा ग्लासमध्ये टाका आणि मिक्स करा आणि तुमची बिअर तयार आहे. मात्र, सध्या ही बिअर पावडर फक्त जर्मनीमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ही बिअर पावडर संपूर्ण जगात उपलब्ध होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. तुम्ही भारतात राहात असाल तर तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावं लागेल, कारण भारतीय बाजारात बिअर पावडरला प्रवेश मिळण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here