Home नागपूर सोन्यात महिनाभरात 3 हजारांनी घसरण ,पाहा आजचा दर

सोन्यात महिनाभरात 3 हजारांनी घसरण ,पाहा आजचा दर

427
0

नागपूर : सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणारांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने 3 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. राज्यातील सराफा मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच सोन्या-चांदीचे दर रोज बदलत असतात. आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ऐन लग्न सराईच्या दिवसात सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी आनंददायी बाब ठरणार आहे. नागपुरातील आजचा सोन्याचा दर 56 हजार 100 रुपये प्रती तोळा आहे. तर चांदीच्या दरात आज 300 रुपयांची घसरण होऊन चांदीचा दर 64 हजार 100 रुपये प्रति किलो आहे. अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दराने तब्बल 59,300 तर चांदीने 72,500 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे वाढलेल्या सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. एक ते 27 फेब्रुवारी पर्यंत सोने 3000 तर चांदी 8 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज नागपूरकरांना सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे.महाराष्ट्रातील लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यांना महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष असते. महाराष्ट्रात आधिक मासात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असते.नागपूरमधील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. भारतीयासांठी सध्याचा काळ हा सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सोने-चांदीची खरेदी सुरू झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात झालेल्या घसरणमुळे बाजारात सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढताना दिसत आहे.नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट – 56,100 ,10 ग्रॅम 22 कॅरेट- 53,300,10 ग्रॅम 20 कॅरेट- 50,600,10 ग्रॅम 18 कॅरेट- 44,900, नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) : 1 ग्रॅम 24 कॅरेट – 5,610,1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,330,1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,060,1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,490
चांदीचे दर: प्रतिकिलो – 66,100
टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here