Home मनोरंजन अनुष्का शर्माची याचिका फेटाळली; हायकोर्टाचा दणका

अनुष्का शर्माची याचिका फेटाळली; हायकोर्टाचा दणका

413
0

मुंबई:अनुष्का स्वतःच्या प्रत्येक कार्यक्रमाला मालमत्ता हक्कानुसार पैसे आकारते. २०१२-१३ आणि २०१३-१४ मधील दोन कार्यक्रमांचा मिळून २.८० इतका कर अनुष्का देणे बाकी होती. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने तिला नोटिस दिली होती.परंतु अनुष्काने या नोटीसविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता अनुष्काची ही याचिका मुंबई हाय कोर्टानं फेटाळली आहे. लवादाची व्यवस्था असताना, थेट हायकोर्टात का आलात? असे अनुष्काला आज कोर्टाने सुनावले.शिवाय अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं अनुष्काला दिले आहेत. तिथे दाद नाही मिळाली तर पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा अनुष्काला देण्यात आली आहे.अनुष्काला सेल्स टॅक्स विभागाने साल २०१२-१३ साठी १२.३ कोटींच्या उत्पनावर १.२ कोटी तर साल २०१३-१४ साठी १७ कोटींच्या उत्पनावर १.६ कोटी रुपये कर आकारला होता. तो अनुष्काने भरला नसल्याने ही थकबाकी वसूल करण्याची नोटीस विक्री कर उपायुक्तांनी पाठवली. त्याविरोधात अनुष्काने याचिका दाखल केली होती.दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं. यातील एका याचिकेवर 29 मार्च न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तर दुस-या याचिकेवर आज हायकोर्टात सकाळच्या सत्रात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये हायकोर्टानं विक्रीकर विभागाचा युक्तिवाद मान्य केला आहे. अनुष्काची याचिका फेटाळा, अशी मागणी विक्रीकर विभागानं हायकोर्टाकडे केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here