Home नागपूर अडीचशे इलेक्ट्रिक बससाठी निधी ; उपमुख्यमंत्री फडणवीस

अडीचशे इलेक्ट्रिक बससाठी निधी ; उपमुख्यमंत्री फडणवीस

257
0

नागपूर : शहरातील प्रवाशांसाठी स्मार्ट सिटीतर्फे २०० वातानुकुलीत विद्युत बससेवा सुरू करण्यात आली आहे. शहराच्या मागणीनुसार अडीचशे वातानुकूलीत विद्युत बसेस खरेदी करण्यासाठी निधी देण्यात येईल, अशी घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.संविधान चौकात स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत या बसेसचे लाकार्पण उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार प्रविण दटके, कृष्णा खोपडे, बंटी कुकडे, संदीप जोशी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी.,

स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. शहरासाठी ८०० बसेसची आवश्यकता असून त्यापैकी २०० बसेस रस्त्यावर आजपासून धावणार आहे. शहर बस थांबा अत्याधुनिक करताना स्टॉपवर येणाऱ्या बसची माहिती असणारे इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात यावे. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे फडणवीस म्हणाले.शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी वातानुकुलीत विद्युत बसेसची संख्या वाढविणे आवश्यक आहे. विद्युत बसमध्ये दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना सुलभपणे बसता व्यावे अशी व्यवस्था निर्माण करावी. प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी अडचण होणार नाही या दृष्टीने मेट्रो व बसचे एकच तिकीट असावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी मार्गावरील ऑटोमॉटिव्ह चौक ते संविधान चौकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. मेट्रो प्रवासाचा अनुभव घेताना वेळेची सुध्दा बचत झाली असल्याचे उपमुख्यमंत्री‍ देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रवासानंतर सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे वांजरा येथे अल्प उत्पन्न गटासाठी वांजरा येथे ४८० घरकूल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाअंतर्गत १४ हजार १६० वर्ग मिटर परिसरात आठ इमारती बांधण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here