Home बीड हिवरा ( बु ) येथील दलित कुटुंबास मारहाण

हिवरा ( बु ) येथील दलित कुटुंबास मारहाण

परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीसात ३८ जाणांवर गुन्हे दाखल

892
0

माजलगाव : गाळपेर्याची वहिती करण्याच्या कारणावरून हिवरा ( बु ) येथे दलित कुटुंबास मारहाण करण्याची घटना दि ११ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी घडली होती. दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांनी घटनास्थळी भेट दिली असून.माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात
दिलेल्या फिर्यादीवरून ३९ जाणांवर गुन्हें दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथे दि ११ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी गाळपेर्याची वहिती करीत असलेल्या विष्णू सुंदर अवघडे वय २८ वर्षे या युवकास गावातील व्यक्ती बाळू तौर,कृष्णा तौर,सोनू देशमुखसह इतरांनी वाद घालून तू येथे वहिती करू नकोस म्हणून कुरापत काढुन मारहाण केली.यावेळी विष्णू याचे साक्षीदार, वडील यांनाही मारहाण केली.या हाणामारीत ३१ लोकांनी काट्या कुराडीचा वापर झाला करत अवघडे कुटुंबातील दहा व्यक्तीना जखमी केले आहे.तर तौर यांच्या फिर्यादीवरून अवघडे यांनी पाण्याची मोटरीवर काट्याकुपाट्या टाकून वाद घालत मारहाण केल्याचा आरोप आहे. अवघडे कुटुंबातील जखमींना बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट दिली असून फिर्यादी विष्णू सुंदर आवघडे यांच्या . फिर्यादीवरून ३१ जणांविरोधात तर भगवान नारायण तौर यांच्या फिर्यादीवरून अवघडे कुटुंबातील ८ जणांवर माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्यागावात तणावपूर्ण शांतता आहे.प्रकरणाचा पुढील तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाटे हे करत आहेत.

यांच्या विरोधात झाले गुन्हे दाखल

१ ) बाळू नारायण तौर २ ) कृष्णा नारायण तौर , ३ ) सोनू देशमुख , ४ ) मुन्ना तौर , ५ ) बिठू विठ्ठल तौर , ६ ) बंडू अंबादास वणवे , ७ ) राम शिंदे , ८ ) मनोज गाडे , ९ ) गंगाधर एकनाथ येवले , १० ) किशोर तौर , ११ ) किशोर जाधव , १२ ) पांडू गाडे , १३ ) ऋषी जाधव , १४ ) सारंग गाडे , १५ ) कृष्णा सुरवसे , १६ ) विशाल तौर , १७ ) बाळू गंगाधर तौर , १८ ) हनुमंत गाडे , १ ९ ) समाधान तौर , २० ) कैलास तौर , २१ ) विलास तौर , २२ ) धीरज भगवान सोळंके , २३ ) महेश सुभाष कोकाटे , सर्व राहणार हिवरा २४ ) माऊली तौर , २५ ) गणेश तौर , २६ ) बाळू तौर , २७ ) नितीन तौर , २८ ) मयूर तौर , २ ९ ) बबलू तौर , ३० ) सारंग तौर , ३१ ) विष्णू तौर सर्व राहणार कळेगाव थडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here