Home मुंबई आज होणाऱ्या ‘संपात’ सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार?

आज होणाऱ्या ‘संपात’ सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार?

404
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी आज(२६ नोव्हें.)देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. त्या अनुषंगाने आज होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम,१९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी शासकीय कामकाज न थांबवता योग्य पद्धतीने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here