Home महाराष्ट्र ७५ वर्षांच्या हौशाबाई लढणार ग्रामपंचायत निवडणूक

७५ वर्षांच्या हौशाबाई लढणार ग्रामपंचायत निवडणूक

461
0

मराठवाडा साथी

कोल्हापूर : ७५ वर्षीय हौशाबाई कांबळे सध्या सोशल मिडीयावर खूप वायरल होत आहे. याचे कारण म्हणजे तरुणांना लाजवेल या उत्साहाने आणि जोशाने त्या यावर्षीच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. त्या गडहिंग्लज तालुक्यातल्या गिजवणे गावातल्या मूळ रहिवासी आहेत. हौशाबाई दुंडाप्पा कांबळे यांचा गावात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळेच त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या इर्षेन उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील हीच इर्षा पाहायला मिळाली. एकीकडे प्रत्येक उमेदवार मोठा गाजावाजा करत अर्ज दाखल करण्यासाठी येत होते, त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील श्रेष्टी विद्यालयावर अर्ज करण्यासाठी गीजवणे गावच्या आजी हौशाबाई कांबळे पोहोचल्या.त्यामुळे सर्वात वयोमान उमेदवार सध्या कोल्हापूरच्या गीजवणे गावाला मिळाला आहे.

हौशाबाई कांबळे यांनी आपणच विजयी होण्याचा विश्वासही व्यक्त केलाय. हौशाबाई कांबळे या देवदाशी असून गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना नातवंडेही आहेत.मुलाने निवडणूक लढविण्यासाठी सहमती दर्शविल्यानंतर त्या थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबगीने पोहोचल्या. स्वत: यल्लामा देवीची भक्त आणि देवदाशी असल्याने त्या गावात जोगवा मागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here