Home औरंगाबाद दुकानाचे शटर उचकटून मोबाईल लंपास करणारा अटकेत

दुकानाचे शटर उचकटून मोबाईल लंपास करणारा अटकेत

10967
0

१४ मोबाईल जप्त ; क्रांती चौक पोलिसांची कारवाई

औरंगाबाद : दुकानाचे शटर उचकटून मोबाईल लंपास करणाऱ्या अट्टल चोराला क्रांती चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हि कारवाई संजयनगर, बायजीपुरा भागात करण्यात आली. हसन खान कलंदर खान (२३, रा. अलंकार टॉकीजजवळ, कबाडी मोहल्ला, जालना) असे अटकेतील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १४ मोबाईल जप्त केले आहेत.
पैठण गेट भागात मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानात ग्राहकांचे महागडे मोबाईल दुरुस्तीसाठी येत असतात. १९ जुलैच्या मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोराने मोबाईल लंपास केले होते. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस तपास करत असताना निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना एकजण चोरीचे मोबाईल विक्रीसाठी संजय नगर, बायजीपुरा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला सापळा लावण्याच्या सूचना दिल्या. विशेष पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बायजीपुरा भागात हसन खान याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने पैठण गेट येथील मोबाईल शॉपी फोडल्याची कबुली दिली. त्याने चोरलेल्या मुद्देमालापैकी विविध कंपन्यांचे १४ मोबाईल पोलिसांनी जप्त केले. हि कारवाई क्रांती चौक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, जमादार संतोष मुदीराज, मंगेश पवार, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भावलाल चव्हाण, हनुमंत चाडवाड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here