Home अंबाजोगाई रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना झाला करोना ; शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन सुखरुप परतले

रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना झाला करोना ; शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन सुखरुप परतले

708
0

मराठवाडा साथी न्युज

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्णांची तपासणी व उपचार करणारे मेडिसिन विभागप्रमुख डॉ . सिध्देश्वर बिराजदार यांनाच करोनाची बाधा झाली . तेथील रुग्णालयात त्यांनी रुग्णांसोबत दोन आठवडे उपचार घेतले. शुक्रवारी ते सुखरूप घरी परतले .
डॉ . बिराजदार घराच्या प्रवेशद्वारात जाताच
त्यांची पत्नी डॉ .सुनिता यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले . यावेळी त्यांचे सहकारी , मित्र व शेजारी ही उपस्थित होते .
वैद्यकीय पद्व्यत्तर शिक्षण घेण्यासाठी येथे आलेले डॉ . सिध्देश्वर बिराजदार शिक्षणा नंतर येथेच
वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले . रूग्णसेवा करताना परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची नाळ त्यांच्याशी जुळली आणि ते लोकप्रिय झाले .
.डॉ . सिध्देश्वर बिराजदार आणि त्यांची पत्नी डॉ . सुनिता बिराजदार दोघे हे येथील वैद्यकीय महाविद्यालयात सेवा करतात . रात्री बेरात्री रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन येताच ते रुग्णसेवेसाठी तयार असतात . त्यांनी लाखों रुग्ण तपासून उपचार केले .
मोठया शहरातील खासगी रुग्णालयांनी त्यांना दुप्पट वेतनाचे आमिष दाखविली आणि निमंत्रण दिले .परंतु सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्यात धन्य माणणारे डॉ . बिराजदार यांची त्यास नकार दिला .
करोनाचा प्रसार सर्वत्र झाला . येथील वैद्यकीय महाविद्यालयात मोठे कोविड सेंटर उभारण्यात आले . त्याची जबाबदारी डॉ . बिराजदारांकडे सोपविण्यात आली .आलेल्या रुग्णांवर उपचार करताना डॉ . बिराजदार त्यांना मानसिक आधार देत होते . अनेक रुग्ण तंदुरुस्त होऊन घरी परतले .
सामाजिक कार्यातही डॉ .बिराजदार नेहमी पुढाकार घेतात . रक्तदान शिबीर , आरोग्य तपासणी शिबीर , रोटरी क्लब, वृक्षारोपन , स्वच्छता अभियान या उपक्रमातही ते सहभागी होतात . गरीब रुग्णांना आर्थिक मदत करतात . त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते लोकप्रिय झाले . ग्रामिण भागातील रुग्ण
आणि सर्वसामान्य रुग्णांच्या कठीण प्रसंगी ते वेळेवर जाऊन उपचार करतात . हृदयविकाराचे रुग्ण , साप चावलेले रुग्ण , विषबाधा झालेले अनेक रूग्ण त्यांनी उपचार करून तंदुरुस्त केले .
सकाळी सायकलिंग , चालणे , बॅडमिंटन खेळणे हा त्यांचा नित्यक्रम आहे . खिलाडूवृत्तीचे निस्वार्थी
व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते . दीर्घ रुग्णसेवा करतानाच ते करोना बाधित झाले . लगेच ते उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले . दोन आठवडे उपचारानंतर ते तंदुरुस्त होऊन घराकडे गेले . प्रवेशद्वारात त्यांची पत्नी डॉ . सुनिता यांनी औक्षण
करून त्यांचे स्वागत केले .परिसरातील नागरिकांम ध्येही आनंदाचे वातावरण पसरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here