Home Uncategorized महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

204
0

महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यावरून अनेकदा राजकीय वातावरण पेटले. यापूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलन केले. यालाच अनुसरून आता हे, आणखी दुसरे प्रकरणे समोर येत आहेत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत लागलेल्या पोस्टवर चक्क छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील आक्रमक झालेत. त्यांनी शिवरायांसोबत अशी तुलना करणे सोडा. त्यांच्या नखाचीही कुणाला सर येणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावलेत.

मुख्यमंत्र्यांच्या या पोस्टरबाजीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू शिंदे आक्रमक झालेत. त्यांनी या पोस्टरचा व्हिडिओ पोस्ट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ते म्हणतात, कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा अपमांनानी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. शिवप्रभू एकमेव होते,आहेत आणि राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांना आवरा,असे स्वतःला एवढे मोठे समजू नका असा सल्लाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
मुंबईत शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यात एका पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. शिवाय पोस्टरच्या वर 350 वर्षांनंतर… पुन्हा तोच योग! असे वाक्य ठळक अक्षरांत टाकले आहे. तर दुसरीकडे पोस्टरवरच्या दुसऱ्या दृश्यात बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देताना दाखवले आहेत. त्यात पाठिमागे आनंद दिघे यांचेही चित्र आहे. त्यावर एक वाक्यही आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे म्हणतात, मला विश्वास आहे. आमचे प्रखर हिंदुत्वाचे विचार आणि भूमिका एकनाथा तूच पुढे नेऊ शकतोस. या सर्व दृश्यचे फोटो ट्विट करून मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here