Home jobs १० दिवसांची मातृत्व रजा; ११ व्या दिवशी चिमुकल्यासह ड्युटीवर पोहचल्या IPS अधिकारी

१० दिवसांची मातृत्व रजा; ११ व्या दिवशी चिमुकल्यासह ड्युटीवर पोहचल्या IPS अधिकारी

226
0

हिसार – महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाही नोकरी असो वा उद्योग सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाताना दिसत आहेत. काही महिला मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठत आज समाजात आदर्श बनून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशीच एक आदर्श असलेली हरियाणातील हांसी पोलीस जिल्हा अधिकारी डॉ. नितिका गहलोत.

गुन्हेगारी बहुल जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हानात्मक काम डॉ. नितिका गहलोत पार पाडत आहेत. कामाप्रती असलेली निष्ठा आयपीएस अधिकारी नितिका गहलोत यांच्या एका उदाहरणावरून दिसून येते, ती म्हणजे केवळ १० दिवसांच्या मॅटरनिटी लिव्हनंतर ११ व्या दिवशी नवजात बालकासह कार्यालयात ड्युटीवर हजर झाल्या होत्या. नितिका गहलोत यांच्या कार्याबद्दल कर्मचाऱ्यांसह स्थानिक जनताही कौतुक करत होती.

महिलांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या नितिका गहलोत आजही मुलीला घेऊन कार्यालयात जनतेच्या समस्या ऐकून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. कामाची वेळ संपल्यानंतरही लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्या कार्यालयात हजर राहतात. मागील अडीच वर्षापासून हांसी पोलीस जिल्ह्याची कमान आयपीएस अधिकारी नितिका गहलोत संभाळत असून या काळात त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवला आहे. छोट्या छोट्या घटनांवर त्या स्वतः लक्ष ठेवतात. गेल्या वर्षी, संपूर्ण राज्यात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे सोडवण्यात हांसी जिल्हा दुसऱ्या आणि अमली पदार्थांची प्रकरणे पकडण्यात तिसऱ्या नंबरवर होता. याशिवाय ४ किलो अफूचे हायप्रोफाईल प्रकरणही एसपी नितिका गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी पकडले. याप्रकरणी महिला गुंडाला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. वाहनचोरीच्या घटनांमध्येही त्यांच्या नेतृत्वाखाली हांसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here