Home आरोग्य छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

279
0

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या भुजबळ निवास्थानी विश्रांती घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. राज्यभरात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे.काल भुजबळ येवला दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी त्यांना येवल्यावरुन नाशिकमध्ये आणलं. नाशिकच्या आपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. त्या रिपोर्टमध्ये कोरोना झाल्याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच१एन१, एच३एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here