Home मनोरंजन पुन्हा नवीन लुकची चर्चा…

पुन्हा नवीन लुकची चर्चा…

186
0

मुंबई : मिलिंद सोमण याने ४ नोव्हेंबर रोजी आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला. धावण्याची आवड असलेला व फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या मिलिंदनं गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली. मात्र, धावताना त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो पूर्ण नग्नावस्थेत धावला. मिलिंदची पत्नीअंकिता कोनवार हिनं त्याची ही छबी कॅमेऱ्यात टिपली. हे एवढ्यावरच थांबलं नाही. मिलिंदनं चक्क त्याचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मिलिंदची पत्नी अंकितानंही एक सेल्फी इन्स्टावर शेअर केला. मिलिंद सोमणच्या या अनोख्या सेलिब्रेशनचं अनेकांनी कौतुक केलं. तर, काहींनी त्यावर टीका केली. आता त्याच्यावर कलम २९४ अश्लिल चाळे केल्याचा व गाणं गायल्याचा व कलम ६७ अंतर्गत सोशल मीडियावर अश्लिल साहित्याचा प्रसार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहमी धावण्याचे किंवा व्यायाम करताणाचे फोटो शेअर करणाऱ्या मिलिंदनं नुकताच एक खास आणि हटके फोटो शेअर केला आहे. डोळ्यात काजळ, नाकात नोज रिंग , मोठे केस ,भेदक नजर सोबतच चेहऱ्याच्या एका बाजूला लागलेला लाल रंग, असा मिलिंदचा लुक या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करताना मिलिंदनं एक कॅप्शनही दिलं आहे.‘मला माहित्येय की होळी नाहीए पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईजवळ असलेल्या कर्जतमध्ये काही मजेशीर गोष्टी केल्या आहेत. लवकरच त्याबद्दल तुम्हाला सांगेन’, असं त्यानं फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. मिलिंदनं त्याच्या आगामी एका प्रोजेक्टसाठी हे फोटोशूट केलं असून लवकरच तो याबद्दल चाहत्यांसोबत खास गोष्टी शेअर करणार आहे. तर अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटानंतर आता मिलिंद सोमन हा देखील ‘ट्रांसजेंडर’ ची भूमिका साकारणार असल्याचे चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here