Home मनोरंजन लाखो लोकांसमोर गायक राहुल वैद्य ने घातली प्रेयसीला लग्नाची मागणी

लाखो लोकांसमोर गायक राहुल वैद्य ने घातली प्रेयसीला लग्नाची मागणी

234
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हे ‘मुगल-ए-आजम‘ चित्रपटाचे गाणे सर्वांनाच फार आवडते. मात्र त्या गाण्याच्या शब्दांप्रमाणेच गायक राहुल वैद्य याने लाखो प्रेक्षकांसमोर एका रिऍलिटी शोच्या माध्यमातून त्याच्या प्रेयसीला चक्क लग्नाची मागणी घातली आहे.

आपल्या आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाता ठाव घेणारा हा गायक राहुल वैद्य याने ‘बिग बॉस १४’ या रिऍलिटी शोमध्ये त्याची प्रेयसी, अभिनेत्री दिशा परमार हिला प्रपोज केले .राहुल हा ‘बिग बॉस १४’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

सोशल मीडियावर या क्षणाची एक लहानशी झलकही दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये राहुलच्या मनात असणारं दडपणही स्पष्टपणे पाहता येत आहे. पण, त्याचा आनंद या क्षणाला इतरांची मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे आता राहुलच्या या प्रपोजलवर दिशाचं काय उत्तर असणार हे जाणून घेण्यासाठीसुद्धा चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/tv/CHcOsS0KcSD/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here