Home आरोग्य कमी कोरोना डोस दिल्याचा आरोप बिनबुडाचा -केंद्रीय आरोग्य मंत्रालय

कमी कोरोना डोस दिल्याचा आरोप बिनबुडाचा -केंद्रीय आरोग्य मंत्रालय

232
0

राजेश टोपेंच्या कमी डोसच्या आरोपाला केंद्राचं उत्तर

नवी दिल्ली : देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्या लशी पोहोचवण्याचं काम सुरू झालं आहे.ह्या लशी महाराष्ट्रातही पोहचल्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या लशी कमी मिळाल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला होता . राजेश टोपे यांच्या आरोपांना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले आहे. राजेश टोपे यांचे आरोप केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत.

कमी कोरोना डोस दिल्याचा आरोप बिनबुडाचा
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांचे 1.65 कोटी डोस देशाची सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पाहून वाटण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोरोना लशीचा हा सुरूवातीचा पुरवठा आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये हा पुरवठा आणखी वाढवला जाईल, त्यामुळे कमी कोरोना डोस दिल्याचा आरोप बिनबुडाचा आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
राज्य सरकारांनी त्यांना मिळालेले 10 टक्के डोस रिझर्व्ह किंवा नुकसानीसाठी ठेवायचा आहे. तसंच दिवसाला एका केंद्रावर 100 लशी द्यायच्या आहेत. प्रत्येक केंद्रावर राज्य सरकारने जास्त लशी देऊन गोंधळ वाढवू नये, तसंच घाई करू नये, अशी गाईडलाईन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सगळ्या राज्यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here