Home मनोरंजन गुरु रंधावा आणि संजना संघीचे “मेहेंदी वाले हाथ “गाणे रिलीज

गुरु रंधावा आणि संजना संघीचे “मेहेंदी वाले हाथ “गाणे रिलीज

232
0

मुंबई : गायक गुरु रंधावा आणि अभिनेत्री संजना संघीचे “मेहेंदी वाले हाथ ” गाणे आजच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या टीजरलाही क्षणात मिलियन लाईक्स मिळाले होते. आता त्याच्या गाण्याला काही वेळातच अधिक लोकांनी पहिले आहे. गुरु रंधावाने याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताच त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नंतर त्याचा खुलासा झाला की, त्याच्यासोबत दिसणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून “मेहेंदी वाले हाथ ” या गाण्यातील अभिनेत्री संजना संघी आहे.

हे गाणे गायक गुरु रंधावाने गेले असून गाण्याचे बोल सय्यद कादरी यांनी लिहले आहेत. तर याला संगीतबद्ध सचेत – परंपरा यांनी केले आहे. या गाण्यात आर्मी मध्ये असणाऱ्या गुरु रंधावा आणि गावची छोरी असणारी संजना संघी यांची फुलणारी प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा लुक प्रेक्षकांना भावत असून गाण्यालाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here