Home अर्थकारण आता 899 मध्ये SpiceJet ने जा देशात कोठेही …..

आता 899 मध्ये SpiceJet ने जा देशात कोठेही …..

203
0

SpiceJet Offer : 899 रुपयांत विमान प्रवास

कोरोना ,त्यात लॉकडाऊन यामुळे स्पाईसजेट या विमान कंपनीला अतोनात नुकसान झेलावे लागले. त्यामुळे या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आता स्पाइसजेटने एक भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीच्या ‘Book Befikar सेल’ला सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट ८९९ रुपयांपासून सुरू होतं. पाच दिवसांच्या या सेलला १३ जानेवारीपासून सुरूवात झाली असून १७ जानेवारीपर्यंत सेल सुरू असेल.सेलमध्ये बूक केलेल्या तिकीटावर १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रवास करता येईल. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे या सेलबाबत माहिती दिली आहे. फक्त देशांतर्गत प्रवासासाठीच ही ऑफर आहे. Book Befikar Sale अंतर्गत बूक केलेल्या तिकीटाची तारीख प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदलू शकतात किंवा रद्दही करु शकतात.

मोफत व्हाउचर :

तिकीट बूक केल्यानंतर कंपनीकडून एक मोफत तिकीट व्हाउचरही दिलं जात आहे. हे तिकीट व्हाउचर १००० रुपयांचे आहे. हे व्हाउचर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वैध असेल. फक्त देशांतर्गत उड्डाणांवर हे व्हाउचर लागू असेल. या व्हाउचरला किमान ५,५०० रुपयांच्या व्यवहारासाठी वापरता येईल.याबाबत अधिक माहिती कंपनीने www.SpiceJet.com या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here